₹3000 मिळाले का तुमच्या खात्यात? लाडकी बहिण योजना – 11वा व 12वा हप्ता जमा सुरू!

मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत एक आनंदाची बातमी दिली आहे. सरकार आता मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र देणार आहे. म्हणजेच महिलांच्या बँक खात्यात थेट 3000 रुपये टाकले जातील.

ही रक्कम दोन वेळा दिली जाईल:

🔹 पहिला हप्ता (11वा): मे महिन्याचा हप्ता वटपौर्णिमेच्या आधी मिळेल.
🔹 दुसरा हप्ता (12वा): 28 जून रोजी मिळेल. या दिवशी योजनेला एक वर्ष पूर्ण होते.

➡️ किती महिला लाभ घेणार आहेत?
या योजनेत 2 कोटी 41 लाख महिलांना फायदा होणार आहे. प्रत्येक पात्र महिलेला 3000 रुपये मिळतील.

➡️ जर एखाद्या महिलेला 10वा हप्ता मिळाला नसेल तर तिला एकत्र 4500 रुपये मिळतील (3 हप्ते मिळून).


या योजनेसाठी कोण पात्र आहे?

  1. महिला महाराष्ट्रची रहिवासी असावी.
  2. वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असावे.
  3. कुटुंबाचे उत्पन्न वर्षाला 2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
  4. महिला व तिचे कुटुंब इनकम टॅक्स भरत नसावे.
  5. चारचाकी गाडी नसावी (ट्रॅक्टर चालेल).
  6. बँक खाते आधारशी लिंक असावे आणि DBT (Direct Benefit Transfer) सुरू असावे.
  7. योजनेच्या वेबसाइटवर नाव नोंदवलेले व मंजूर असावे.

हप्ता मिळाला का, हे कसे तपासायचे?

जर तुम्हाला हप्ता मिळालेला नाही, तर ही स्टेप्स फॉलो करा:

  1. 👉 वेबसाईटला भेट द्या: https://mmlby.maharashtra.gov.in
  2. 👉 “अर्जदार लॉगिन” वर क्लिक करा
  3. 👉 तुमचा मोबाइल नंबर आणि पासवर्ड टाका
  4. 👉 “Application Made Earlier” वर क्लिक करा
  5. 👉 “Actions” मध्ये चिन्हावर क्लिक करा
  6. 👉 तिथे तुम्हाला तुमचे हप्ते मिळाले की नाही, हे दिसेल

3370 कोटी रुपयांचा निधी मंजूर

राज्य सरकारने या योजनेसाठी 3370 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामुळे महिलांना वेळेवर पैसे मिळणार आहेत.


योजनेचा उद्देश काय आहे?

ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी आहे. यामुळे त्या छोटे व्यवसाय सुरू करू शकतील.


जर तुमचा अर्ज मंजूर झालेला नसेल किंवा अजून हप्ता मिळालेला नसेल, तर 181 हेल्पलाइन नंबर वर कॉल करून माहिती मिळवा.

Leave a Comment