सरकार देणार मोफत गाय-म्हैस, अर्ज प्रक्रिया आणि पात्रता नियम वाचा!

शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र सरकारने “गाई-म्हैशी वाटप योजना 2025” सुरू केली आहे. या योजनेत तुम्हाला मोफत दोन जनावरे – गाय किंवा म्हैस – दिली जाणार आहेत.
हे जनावरे घेऊन दूध विकण्याचा व्यवसाय सुरू करता येईल आणि त्यामुळे तुमचं रोजचं उत्पन्न वाढवता येईल.


योजनेची माहिती:

योजनेचे नाव: गाई म्हैशी वाटप योजना 2025
लाभ: मोफत 2 दूध देणारी जनावरे (गाय किंवा म्हैस)
उद्देश: गावातील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणे
अर्ज सुरू होण्याची तारीख: 3 मे 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2 जून 2025
अर्ज करण्यासाठी वेबसाईट: ah.mahabms.com किंवा AH-MAHABMS मोबाईल अ‍ॅप


योजना कोणासाठी आहे?

  • गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ
  • महिला बचत गटातील महिलांना प्राधान्य
  • 1 ते 2 हेक्टर जमीन असलेले छोटे शेतकरी
  • शिकलेले पण नोकरी नसलेले तरुण, जे रोजगार कार्यालयात नोंदलेले आहेत

सरकारकडून मिळणारे पैसे (अनुदान):

लाभार्थीजनावरेसरकारकडून मिळणारे पैसे
अनुसूचित जाती (SC)गाय – ₹70,000 x 2 = ₹1,40,000 म्हैस – ₹80,000 x 2 = ₹1,60,00075% अनुदान
सामान्य शेतकरीवरील प्रमाणेच50% अनुदान

अर्ज करताना लागणारी कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साइज फोटो
  • 7/12 आणि 8A जमीन कागदपत्र
  • जात प्रमाणपत्र (जर लागले तर)
  • बँक पासबुक
  • वयाचा पुरावा
  • रेशन कार्ड किंवा कुटुंबाचा पुरावा
  • शिक्षणाचं प्रमाणपत्र
  • रोजगार नोंदणीचा पुरावा (जर लागला तर)
  • गोठा (जनावरं ठेवण्याची जागा) बांधण्यासाठी आर्थिक मदत
  • चारा कापायचं मशीन
  • खाण्याचा साठा ठेवण्यासाठी जागा
  • 3 वर्षांसाठी विमा सुरक्षा
  • जर तुम्ही 2021, 2022 किंवा 2023 मध्ये अर्ज केला असेल, तर तुम्ही पुन्हा अर्ज करू शकत नाही.
  • अर्ज भरताना फक्त एकदाच दुरुस्ती करता येते, त्यामुळे अर्ज काळजीपूर्वक भरा.
  • योजना स्वीकारल्यावर हमीपत्र द्यावं लागेल.
  • सर्व माहिती SMS द्वारे कळवली जाईल.
  • काही अडचण असल्यास टोल फ्री नंबर 1962 वर सकाळी 7 ते संध्याकाळी 6 दरम्यान कॉल करा.

ही योजना शेतकरी, महिला आणि बेरोजगार तरुणांसाठी खूप उपयोगी आहे. गाई-म्हैशीचे दूध विकून घरबसल्या उत्पन्न मिळवता येते. त्यामुळे लवकर अर्ज करा, योग्य कागदपत्रे तयार ठेवा आणि शेतीसह एक चांगला व्यवसाय सुरू करा!

Leave a Comment