महाराष्ट्रातील लाखो महिलांना सरकारकडून दरमहा मिळणाऱ्या ‘लाडकी बहिण योजना’ च्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या योजनेतील हप्ता महिलांच्या रोजच्या गरजांसाठी महत्त्वाचा आहे.
अता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे – ३० एप्रिल २०२५ रोजी, अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर, लाडकी बहिण योजना हप्ता थेट बँक खात्यात जमा होणार आहे.
काय आहे लाडकी बहिण योजना?
ही योजना १ जुलै २०२४ पासून सुरू झाली. यामध्ये २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक महिलांनी या योजनेत नाव नोंदवली आहे.
हे पैसे महिलांना स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी मदत करतात आणि त्यांचं आर्थिक सशक्तीकरण साधलं जातं.
सध्या किती मिळतात आणि किती मिळणार?
- सुरुवातीला सरकारने दरमहा २१०० रुपये देण्याचं वचन दिलं होतं.
- पण सध्या राज्याच्या आर्थिक अडचणीमुळे फक्त १५०० रुपये देण्यात येत आहेत.
- पुढे राज्याची आर्थिक स्थिती सुधारली की रक्कम वाढवली जाईल असं सरकारने सांगितलं आहे.
कोणाला मिळतो हप्ता?
- २१ ते ६५ वर्षांच्या महिला – या वयोगटातील महिलांना हप्ता मिळतो.
- महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या महिलांनाच हप्ता मिळतो. लग्नानंतर इतर राज्यात गेलेल्या महिलांना मिळणार नाही.
- काही महिलांचे अर्ज चुकीची माहिती किंवा कागदपत्रांअभावी अपात्र ठरवले गेले आहेत.
किती महिलांना लाभ मिळतो?
- सध्या अंदाजे २.५ कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळतो.
- यातील काही महिला वयोमर्यादा पार केल्यामुळे योजनेतून वगळल्या जातात.
- यंदा सुमारे १.२ लाख महिलांना वयोमर्यादेमुळे हप्ता मिळणार नाही.
- काही नव्या महिलांची नोंदणी झाली आहे, त्यामुळे एकूण लाभार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
अपात्र अर्जदारांची माहिती
- सुमारे ११ लाख अर्ज हे अपूर्ण माहिती किंवा चुकीच्या कागदपत्रांमुळे अपात्र ठरवले गेले आहेत.
- सरकारकडून अर्जांची सतत छाननी आणि अद्ययावत यादी तयार केली जाते.
एप्रिल महिन्याचा लाडकी बहिण योजनेचा हप्ता ३० एप्रिल रोजी खात्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे महिलांना सणासुदीच्या पार्श्वभूमीवर थोडा आर्थिक दिलासा मिळणार आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वाची ठरली आहे.